निवडणूक प्रचाराच्या केंद्रस्थानी शेतकरी

मुंबई :

लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा ग्रामीण भागाच्या केंद्रस्थानी शेतकरी हाच घटक असल्याचे चित्र आहे. सर्व पक्ष आणि उमेदवार ग्रामीण भागात प्रचार करताना आपण कसे शेतकरी हितासाठी लढतोय असेच सांगत आहेत.

भाजपने राष्ट्रीय सुरक्षा आणि हिंदुत्व या मुद्यांना केंद्रस्थानी ठेवून प्रचार सुरू केलेला असतानाच काँग्रेस पक्षाने जाहीरनाम्यात शेतकरी, महिला व युवक यांना स्थान अग्रक्रम दिला. त्यामुळेच यंदाची ही निवडणूक पुन्हा शेतकरी केंद्रित होत आहे. सध्या ग्रामीण भागात असेच चित्र आहे. अहमदनगर जिल्ह्यातील भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांनी आत्महत्याग्रस्त शेतकरी कटुंबियांसमवेत गुढीपाडवा सण साजरा केला. तत्पूर्वी याच जागेवरील राष्ट्रवादीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांनी शेतकरी कटुंबियांसमावेत अर्ज भरून आपण कसे शेतकरी हितासाठी काम करतोय हे सांगण्याचा प्रयत्न केला होता. तर, आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेने यवतमाळ-वाशीम या मतदारसंघात वैशाली येडे यांना उमेदवारी देऊन विदर्भात निवडणूक शेतकरी केंद्रित करण्यात यश मिळविले आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*