झटका म्हणजे नोटबंदी व धोरण : ठाकरे

मुंबई :

एखादा झटका आला म्हणून देशाचे धोरण नाही ठरविता येते. हुकूमशाही पद्धतीने काम करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कोणावरही विश्वास नाही. झटका आला म्हणून नोटबंदी केल्याची टीका मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केली.

ते म्हणाले की, नोटबंदी या एकाच निर्णयामुळे 4 कोटी नागरिक बेरोजगार झाले. त्यांच्या नोकऱ्या गेल्या. पुलावमा हा हल्ला भाजपाच्या राजकारणासाठी केल्यासारखे चित्र आहे. देशात आरडीएक्स कुठून आले, हा प्रश्न अनुत्तरित आहे. त्याचवेळी भाजप याच्या राजकीय लाभ घेण्यासाठी पुढे आला आहे. हे दुर्दैव असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*