आरोग्य दिनानिमित्त विशिष्ट पोस्ट व्हायरल

निवडणूक प्रचारात विशेष आणि नाविन्यपूर्ण फंडा वापरण्यामध्ये सर्व राजकीय पक्ष व नेते पुढे असतात. नाव न घेताच विशिष्ट संदेशही अशावेळी दिला जातो. सोशल मीडियाच्या काळात त्याला विशेषतः व्हायरल केले जात आहे.

जागतिक आरोग्य दिनानिमित्त फेसबुक व व्हॉट्सअपवर एक पोस्ट व्हायरल करण्यात आली आहे. ही पोस्ट नेमकी कोणी व्हायरल केली याबाबत त्यावर काहीही लिहिले नाही. मात्र, प्रचार तंत्राचे शास्त्र वापरून त्यात काही विशिष्ट संदेश रुजविण्यासाठीचा प्रयत्न केला जात आहे. एकीकडे स्टेथास्कोप आणि दुसरीकडे चाकू असा फोटो टाकून त्यावर फक्त निर्णय तुमचा अशी ही इमेज पोस्ट आहे. यामागील हेतू स्पष्ट असून, त्यातून स्वच्छ प्रतिमा विरुद्ध गुन्हेगारी व्यक्ती असाच संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे. नगरसह पुणे व महाराष्ट्रातील ग्रुपवर हा मेसेज व्हायरल केला जात आहे.

नाॅमचाॅमस्कीच्या तत्वाचा वापर करून सोशल मीडियावर सध्या जोरात प्रचार सुरू आहे. प्रतिमा रुजवणे हाच फंडा आणि स्वच्छ प्रतिमा विरुध्द गुन्हेगारी हा मेसेज देण्याचा हा प्रयत्न आहे. निवडणुकीत आज जागतीक आरोग्य दिवसाच्या निमीत्ताने कल्पक वापर सुरू आहे. अनेक फेसबुक युजरकडुन मोठ्या प्रमाणात पोस्ट ही शेअर केली जात आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*