मोदींच्या घरात आहेत त्यांचा कुठे पत्ता नाही : पवार

मुंबई :

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देश पातळीवरचे नेतेही सध्या वैयक्तिक टीका करत आहेत. याचेच उदाहरण द्यायचे झाले तर नुकत्याच महाराष्ट्रात झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माजी केंद्रिय कृषीमंत्री शरद पवार यांच्या कुटुंबात कलह झाला अशी टीका झाली होती. यावर शरद पवारांनी मात्र, कसलेल्या पुढाऱ्यासारखे प्रत्युत्तर दिले.

मोदींना कुटुंबाचा अनुभव नाही. त्यांच्या घरात कोणी नाही. जे आहेत ते कुठेत याचाही पत्ता नाही असे नेमक्या शब्दात टीका केली. यावेळी पुण्यात झालेल्या सभेत त्यांनी मोदींना लक्ष केले. भारतीय जनता पार्टीचा पराभव हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे असेही त्यांनी सांगितले. शेतकरी प्रश्न, 56 इंच छाती, कुलभुषन जाधव असे अनेक मुद्दे समोर आणत त्यांनी मोंदीवर टीका केली.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*