आता फ्लेक्समधूनही अडवाणी आऊट

मुंबई :

राजकारण आणि व्यावसाय यात गरज सरो वैद्य मरो, हीच नीती कायम आहे. त्याचाच प्रत्यय लालकृष्ण अडवाणी व भाजपचे कार्यकर्ते घेत आहेत.

ज्या लालकृष्ण अडवाणींचा भाजपला मोठे करण्यामधे सिंहाचा वाटा आहे त्यांना मोदी सरकार आल्यानंतर अडगळीत टाकण्यात आले असे बोलले जात होते. आता त्यांना लोकसभेचे तिकीटही दिले नाही. त्यांच्या मतदारसंघातून अमित शहा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यावेळी खुद्द भाजपमधेही अडवाणींवर अन्याय होत आहे असे सामान्य कार्यकर्त्यांच्या तोंडून बोलले जात आहे.
महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या प्रचार कार्यालयाचे उदघाटन झाले. या प्रचार कार्यालयाच्या फ्लेक्समधे अडवाणींना स्थान दिलेले नाही. आता देश पातळीवर अडवाणींना डावलले जात असताना राज्य पातळीवरही अडवाणींना डावलले जात आहे. भाजपच्या जेष्ठ नेत्याची ही अवस्था सामान्य कार्यकर्त्यांना खटकत आहे. हा नाराजीचा सुर भाजपच्या मतदानामध्ये परिणामकारक ठरणार का हे येणाऱ्या निवडणुकीतच कळेल.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*