म्हणून भाजप सोडून ते झाले मनसेवासी

मुंबई :

लोकसभा निवडणुकीत उमेदवार नसूनही सत्ताधारी भाजपला जेरीस आणणाऱ्या व्यक्ती व पक्षांच्या यादीत मनसे व त्या पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे अग्रभागी आहेत. त्याचेच परिणाम म्हणून आता काहीजण भाजपला सोडचिठ्ठी देत मनसेवासी होत आहेत.

आगामी विधानसभेचा विचार करत अनेक जण पक्षबदलाचा विचार करत आहेत. भाजपचे नगरसेवक मनोज बावनगडे यांनी महाराष्ट्र नवनिर्मान सेनेत प्रवेश केला आहे. पुन्हा एकदा राज ठाकरे नावाचे वादळ सुरू झाले आहे. आणि मुद्देसूद प्रहार करण्यामुळे ते परत नव्याने पेटून उठले आहेत. मनसेने लोकसभा निवडणुक न लढवता आगामी विधानसभा निवडणुकांवर फोकस करतील असे दिसत आहे.याचे कारण तरूणांकडून राज यांना मिळणारी पसंती हे आहे. तसेच विधानसभा निवडणुकीची चांगली तयारी करतील असे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे ईतरही नेते मनसेत प्रवेश करण्यास इच्छुक आहेत अशी माहिती सुत्रांकडून मिळाली.
मुंबई आणि ठाणे परिसरातील अनेक भाजप पदाधिकारी आणि विविध पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी मनसेत प्रवेश करत आहेत.
काल राज यांनी शिवाजी पार्कवर घेतलेल्या सभेमुळे सर्व सोशल मिडीया राज’मय’ झालेला पाहायला मिळाला.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*