काश्मीरमध्ये भाजपचा रंग हिरवा..!

दिल्ली :

लोकसभा निवडणुका जवळ येत असताना जसे राज्य बदलत आहे तसे भाजपचे रंग बदलत आहेत. कादाचीत हीच भाजपची स्ट्रॅटेजी असु शकते. काश्मीरमधील श्रीनगरमधे येथे भाजप उमेदवार खालिद जहांगीर या ऊमेदवाराच्या फ्लेक्सवर चक्क संपूर्ण हिरव्या रंगाचा वापर करत प्रचार सुरू आहे.

खालिद है तो साॅलिड है अशी टॅगलाईन वापरत हा प्रचार सुरू आहे. एरव्ही फक्त हिंदूत्वाच्या मुद्दा घेऊन सर्वत्र भगवा रंग वापरत राजकारण करणारे आता सत्तासंपादन करण्यासाठी हिरवा रंग सोबत घेणार का असा प्रश्न सामान्य भाजप कार्यकर्त्यांना पडला आहे. फक्त फ्लेक्स नव्हे तर फोटो, जाहिरात, व्हिडीओ सगळीकडे हिरव्या रंगाचा वापर केला आहे. काश्मीरचे भाजप प्रवक्ते अलताफ ठाकूर यांनीही या जाहिरातींना समर्थन दिले आहे.

या फ्लेक्सवर मोदींचा फोटोही वापरला आहे आणि त्यावर निष्ठावंत भाजप पदाधिकारी किंवा कार्यकर्ते यावर प्रश्न का विचारत नाहीत हि बाब विशेष आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*