‘पवारांनी यामुळे काढला माढ्यातुन पळ’

सोलापूर :

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी माढ्यातून का माघार घेतली यावर अनेक लोकांनी वेगवेगळे मते व्यक्त केली. काहींनी तर गृहकलह हे कारण सांगितले. आता मात्र पवार यांनी वंचित बहुजन आघाडीमुळे माघार घेतली असे आनंदराज आंबेडकर यांनी सांगितले.

मोहोळ येथे झालेल्या वंचित बहुजन आघाडीच्या सभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी बाळासाहेब आंबेडकर यांच्या विरोधातील भाजप उमेदवार जयसिद्धेश्वर स्वामी यांच्यावरही टीका केली.
महाराजांनी मंदिरात प्रवचन करावे. संसद हे महाराजांचे ठिकाण नाही असेही ते म्हणाले.

माढा आणि सोलापूरची लढाई ही वंचित बहुजन आघाडी विरूद्ध भाजप अशी आहे असेही त्यांनी सांगितले.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*