शेतकऱ्यांना पेन्शन व 35 लाख कोटी खर्चाचा संकल्प..!

दिल्ली :

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी महिला, कष्टकरी, तरुण व शेतकऱ्यांना न्याय देण्याची घोषणा जाहीरनाम्यात केली आहे. त्यामुळे काँग्रेस सुसाट असल्याचे लक्षात घेऊन सत्ताधारी भाजपनेही शेतकरी हिताच्या धोरणांना जाहीरनाम्यात संधी दिली आहे.

एकूण ७५ संकल्प भाजपने जाहीरनाम्यात दिले आहेत. त्यात म्हटले आहे की, ६० वर्षावरील शेतकऱ्यांसाठी पेन्शन योजना सुरु केली जाईल. कृषी क्षेत्रातील उत्पादन वाढवण्यासाठी ३५ लाख कोटी रुपयांचा निधी दिला जाईल, शेतकऱ्यांना किसान क्रेडीट कार्डवर १ लाखांपर्यंतचे बिनव्याजी कर्ज, २०२२ पर्यंत देशभरात १० हजार शेतकरी उत्पादन कंपन्या स्थापन करणार, सर्व घटनात्मक प्रक्रियापूर्ण करून राम मंदिराचे निर्माण करणार, लघु उद्योगासाठी एक खिडकी योजना, देशातील सर्व घरांत वीज कनेक्शन देणार, प्रत्येक व्यक्तीला ५ किलोमीटरपर्यंत बँकिंग सेवा उपलब्द करणार, तीन तलाकचा कायदा बनवून मुस्लीम महिलांना न्याय देणार, आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत १.५ लाख वेलनेस सेंटर उभारणार आदी.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*