राष्ट्रवादी म्हणजे ‘नातू चलाव पार्टी’ : डॉ. सुजय विखे

अहमदनगर :
शेतकरी प्रश्नांचे भांडवल करुन राजकीय पोळी भाजुन घेणारा राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष ‘नातू चलाव पार्टी’ असल्याची बोचरी टीका भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केली.

श्रीगोंदा तालुक्यातील प्रचार दौऱ्यात डॉ. विखे यांनी शेतकरी व ग्रामस्थांशी संवाद साधला. ते म्हणाले की, काद्यांच्या भावासंदर्भात ऊसाप्रमाणेच हमीभावाचा निर्णय करण्यासाठी संसदेत पाठपुरावा करणार आहे. माझी निवडणुक ही शेती, शेतकरी आणि पाणी या त्रिसुत्रीवरच आहे, याचाही पुनरुच्चार त्यांनी केला.

याप्रसंगी माजी मंत्री बबनराव पाचपुते यांचेही भाषण झाले. दरम्यान लोणी व्यंकनाथमध्ये कुकडीच्या पाण्यासाठी सुरु केलेल्या आंदोलनाला डॉ. सुजय विखे पाटील यांनी भेट दिली. त्यांनी दिलेल्या ग्वाहीनंतर ग्रामस्थांनी आपले आंदोलन स्थगित करुन निवडणुकीवरील बहीष्कारही मागे घेतला. यावेळी जिल्हा परिषद सदस्या कोमलताई वाखारे यांनी माजीमंत्री बबनराव पाचपुते आणि डॉ.सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*