‘त्यांनी’ भूमिपुत्र असूनही श्रीगोंद्याला काय दिले : डॉ. विखे

अहमदनगर :
श्रीगोंद्याचे भूमिपुत्र म्हणून मतदान मागणाऱ्यांनी विधान परिषद आमदार म्हणून आलेल्या निधींपैकी पाच पैसेही तालुक्याला दिले नाही. ते काय प्रश्न सोडविणार, अशी टीका भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केली.

श्रीगोंदा तालुक्यातील प्रचार दौऱ्यात त्यांनी संसदेत पाठविण्यासाठी मतदान करण्याचे आवाहन केले. माजी मंत्री बबनराव पाचपुते हेही त्यांच्यासमवेत होते. डॉ. विखे यांनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस व त्यांचे उमेदवार आमदार संग्राम जगताप आणि त्यांचे वडील आमदार अरुण काका जगताप यांचे नाव न घेता टीका केली.

ते म्हणाले की, लोकसभेमध्ये जाऊन बोलण्यासाठी अभ्यास व इंग्रजी यावे लागते. जे विधानसभेत 2 मिनिटांपेक्षा जास्त बोलू शकले नाहीत ते लोकसभेत नाही प्रश्न मांडू शकणार. तालुक्याचे भुमिपुत्र असुनही विधान परिषद सदस्य या नात्याने 5 पैशांचाही निधी दिला नाही.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*