म्हणून अनुश्या (रिकाम्या) पोटी चहा नको..!

परकीय पेय असूनही साखरेचा चहा हे आता सर्व भारतीयांचे आवडते आणि लोकप्रिय पेय बनले आहे. चहा पिण्याचे काही फायदे आहेतही. मात्र, आता चहा टाळण्याकडे अनेकांचा कल दिसतो. कारण अॅसिडिटी.

चहाचे असेच दुष्परिणाम टाळण्यासाठी आपल्याला चहा कधी पिऊ नये हेही समजून घ्यायला नकोय का? तर, सकाळी उठल्यावर लगोलग अनुश्यापोटी (पोट रिकामे असताना) चहा पिऊ नये. यामुळे पाचक रसांवर दुष्परिणाम होऊन मग अॅसिडिटी वाढते.

तसेच आपली पचनशक्ती यामुळे कमजोर होते. भूकही मंदावते. त्याचे परिणाम आपल्या शरीरावर दिसतात. सदृढ आरोग्य त्यामुळे धोक्यात येते. अनेकदा पोटात जळजळ होऊन उलट्याही होतात. त्याने जीव घाबरून आपला बिपी वाढू शकतो.

हे सर्व दुष्परिणाम टाळण्यासाठी सकाळी पोट रिकामे असताना गरम चहा टाळा. तसेच चहासमावेत बिस्कीट, टोस्ट असे काही पदार्थही आपण खाऊन दुष्परिणाम टाळू शकतो.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*