विखेंनी लक्ष केंद्रित केले नगर शहर व तालुक्यावर..!

अहमदनगर :

भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांना उपरा किंवा बाहेरचा उमेदवार ठरविण्याचा प्रयत्न करून राष्ट्रवादीने नगर दक्षिणेत प्रचाराची आघाडी उघडली आहे. त्याला काटशह देताना विकास आणि संपर्क हे मुद्दे पुढे करून डॉ. विखे यांनी आता नगर शहर व तालुक्यावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे.

मंगळवारी डॉ. विखे यांनी नगर शहरात सुप्रभात ग्रुपच्या सदस्यांशी संवाद साधला. तसेच तालुक्यातील नेप्ती, निमगाव वाघा, हमिद्पूर, जखनागाव, हिंगणगाव, पिंपळगाव वाघा यासह कल्याण रोडवरील गावांमध्ये विशेष लक्ष देत दौरा केला. यावेळी त्यांच्यासमवेत नामदार विजयराव औटी, जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, बाळासाहेब हराळ, पंचायत समिती सभापती रामदास भोर, अरुण होळकर आदि उपस्थित होते. महाआघाडीने विखे यांच्या पाठीशी ताकद उभी केल्याने नगर तालुक्यात विखेंना विजयी मताधिक्य मिळण्याची शक्यता या नेत्यांनी व्यक्त केली आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*