राज ठाकरेंना कुठल्याही स्क्रीप्टची गरज नाही : अजित पवार

पुणे :

एकेकाळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे एकमेकांचे मोठे टीककार होते. अगदी वैयक्तिक पातळीवर जाऊन त्यांनी एकमेकांवर टीका केली होती. याच अजित पवारांनी आता राज ठाकरे यांच्या समर्थनार्थ नव्या वादात ऊडी घेतली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंची स्क्रीप्ट बारामतीहून लिहून येते असा आरोप केला होता. तसेच भाजप मुंबईचे प्रमुख आशिष शेलार यांनीही शिवाजी पार्कच्या बाभळीला बारामतीची बोरे अशी टीका ट्वीटरवरून केली होती. या आरोपांचे खंडन करण्यासाठी अजित पवार यांनी या वादात ऊडी घेतली आहे. राज ठाकरे हे बाळासाहेबांचे पुतणे आहेत त्यांना कुठल्याही स्क्रीप्टची गरज नाही असे अजित पवार म्हणाले असे म्हणत राज यांच्या आरोपांचे खंडण केले आहे. यावेळी ते सुप्रियाताई सुळे यांच्या प्रचारासाठी कन्हेरी गावात ते बोलत होते.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*