विखे नाही वेगळे वागणार : थोरात

अहमदनगर :

उद्या अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा आहे. या सभेत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे हे भाजपात प्रवेश करतील अशी चर्चा सर्वत्र चालू आहे. याच पार्श्वभूमीवर विखे पाटील राज्याचे स्टार प्रचारक आहेत आणि त्यांच्यावर राज्याची जबाबदारी आहे. भाजप प्रवेश करून ते असे वेगळे वागतील असे वाटत नाही असे आ.बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.

सर्वच पक्षाच्या नेत्यांची मतभेद असतात पण यावेळी निवडणुक ही विचारधारेची असल्याने सर्वांनी एकत्र आले पाहिजे असेही त्यांनी सांगितले. आता विखे पाटलांशी हातमिळवणी करण्याच्या उद्देशाने थोरातांनी एक पाऊल टाकले आहे. विखे पाटील याला कशी प्रतिक्रिया देतात हे पाहणे महत्वाचे आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*