मोदींसमवेत बसणार हे नगरकर..!

अहमदनगर :

अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार डाॅ.सुजय विखे पाटील यांच्या प्रचार सभेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या अहमदनगर येथे येत आहेत. यावेळी पंतप्रधानांच्या व्यासपीठावर कोण कोण असतील त्यावर स्थायिक नेत्यांचे राजकीय वजन किती आहे ते ठरणार आहे.

सभेच्या व्यासपीठावर ज्यांचे तिकीट कापून सुजय यांना तिकीट दिले असे खासदार दिलीप गांधी, शिवसेना उपनेते अनिल राठोड, पालकमंत्री राम शिंदे आणि भाजपचे उमेदवार डाॅ.सुजय विखे यांच्यासमवेत सर्व भाजप आमदार हे व्यासपीठावर असतील. ईतर कुठल्याही नेत्याला किंवा पदाधिकार्याला मात्र व्यासपीठावर संधी नाही.
सुमारे दोन लाख लोक या सभेत असतील असा अंदाज आहे. शहरातील लोहार मळा येथे 21 एकर जागेत हि सभा होणार आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*