
अहमदनगर :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आजच्या सभेनंतर नगर लोकसभा मतदारसंघाचे चित्र खऱ्या अर्थाने स्पष्ट होणार आहे. त्यामुळेच मोदींच्या सभेतील गर्दी व ते मांडणार असलेल्या मुद्यांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांच्या पाठीमागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व ताकद उभी केली आहे. त्यामुळेच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासह भाजपने ही जागा प्रतिष्ठेची केली आहे. दोन्ही बाजू आपल्याला विजयी आघाडी मिळण्याचा दावा करीत आहेत. त्याचेच चित्र आजच्या मोदींच्या सभेत ठरणार आहे. मागील वर्षीप्रमाणे यंदाही मोदींचा करिष्मा चालल्यास ही जागा भाजपकडेच राहील असे चित्र असेल.
Be the first to comment