गांधी भडकले, पण सुजय विखेंनी दाखविला समजूतदारपणा

अहमदनगर :

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत भाषण उरकते घेण्याची चिठ्ठी आल्याने खासदार दिलीप गांधी भडकले होते. मात्र, प्रसंगावधान राखीत उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांनी त्यांना पुन्हा भाषण करण्यासाठीची विनंती केल्यानंतर गांधी यांनीही समजूतदारपणा दाखवीत हा विषय सहजपणे मिटवला.

मोदी यांच्या सभेला 2014 प्रमाणेच नागरकरांची प्रचंड गर्दी होती. मोदींनीही आपल्या शैलीदार भाषणातील फटकेबाजीने या गर्दीला खुश केले. मात्र, तत्पूर्वी खासदार गांधी यांना भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड यांनी भाषण आटोपते घेण्याची चिठ्ठी दिली. त्यावेळी गांधी मागील पाच वर्षांत केलेल्या विकासकामाबद्दल माहिती देत होते. मध्येच चिठ्ठी आल्याने तेही तात्पुरते भडकले. मात्र, प्रा. बेरड व डॉ. सुजय यांनी समजूतदारपणा दाखवून त्यांना पुन्हा बोलण्याची विनंती केली. गांधी यांनीही पक्षाहीतलामहत्व देताना सामंजस्य दाखवीत या वादावर पडदा टाकीत दिलजमाई झाल्याचे जाहीर केले.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*