फ्रिजमधील अंडी खावीत का..?

उन्हाळ्यात वाढत्या तापमानात कोणतेही अन्नपदार्थ खराब होण्यासाठी खूप कमी वेळ लागतो. अशावेळी घरातील शिजवलेले किंवा न शिजवलेले भाजीपाला,चिकन, मटण, अंडी असे पदार्थ फ्रीजमध्ये ठेऊन नंतर गरजेनुसार काढून खाल्ली जातात. मात्र, अशावेळी फ्रिजमधील अंडी खाऊ नयेत अशाही बातम्या आपण वाचतो. होय, डीप फ्रीजमध्ये किंवा फ्रिजरमधील अंडी खाल्ल्याने आपणास हवे असे अन्नघटक नाही मिळत. मात्र, नियंत्रित तापमानात अर्थात रूम टेम्परेचरला अंडी ठेऊन खाल्ल्याने काहीच तोटा होत नाही.

फ्रीजमध्ये खूप कमी तापमानाला अंड्यातील पोषक घटक कमी होतात. मात्र, असे अंडेही खाण्यास योग्य असते. फक्त त्यातून पोषक घटक नक्कीच कमी असतात. तर, रूम टेम्परेचरला (तापमान 16 ते 30 अंश सेल्सिअस) अंडी ठेवल्यास टिकतात आणि खाण्यासाठी उत्तम असतात. फ्रिजमधील पहिल्या स्टेजला अंडी ठेऊन खाल्ल्यानेही पोषक घटक मिळत असल्याचे काही संशोधनातून स्पष्ट झाले आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*