तर निवडणुकीतुन माघार घेईन : कूल

पुणे :

दौंड तालुक्यात माजी आमदार रमेश थोरात आणि आमदार राहूल कुल यांच्यातील सख्य सर्वांना माहिती आहे. चौफुला येथे झालेल्या युवक मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी थोरात यांच्यावर टीका केली. दौंड तालुक्याचे माजी आमदार रमेश थोरात हे त्यांच्या आमदाकीच्या काळात पाणी प्रश्नावर बोलले असतील याचा पुरावा द्या मी पुढच्या विधानसभा निवडणुकीतुन माघार घेईन असे वक्तव्य आमदार कुल यांनी केले.

लोकसभा निवडणुकीत कूल यांच्या पत्नी कांचन कूल या खा. सुप्रियाताई सुळे यांच्या विरोधात भाजपकडून उतरल्या आहेत. रमेश थोरात हे सुप्रिया सुळे यांना मदत करतील त्यामुळे सुप्रियाताईंच्या कामावर बोलण्यापेक्षा थोरातांच्या कामावर टीका करत थेट मुळाशी घाव घालण्याचा प्रयत्न कूल यांनी केला आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*