मोहीतेंनी मागितले घड्याळासाठी मत..!

सोलापूर :

माणूस सवयीचा गुलाम असतो. याच सवयीमुळे भाजप – शिवसेना युतीच्या ऊमेदवाराच्या सभेत चक्क घड्याळासाठी मत द्या असे आवाहन केले गेले. नुकतेच राष्ट्रवादीतून भाजपात प्रवेश केलेले रणजितसिंह यांना राष्ट्रवादीच्या सहवासाची ईतकी सवय झालेली आहे त्यामुळे घड्याळासाठी मत मागण्याचा प्रकार त्यांच्याकडून घडला. पण लगेच लक्षात आल्यामुळे त्यांनी माफी मागत हात जोडले. यावेळी उपस्थितांमधे हशाही पिकला.

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे भाजपात प्रवेश करूनही मोहीते पाटलांचे राष्ट्रवादी काँग्रेस वरील प्रेम कमी झालेले नाही अशा आशयाचे मेसेज फिरत होते. यावेळी सोशल मिडीयावर ते ट्रोलही झाले. माढा येथील युतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारासाठी सांगोला येथे ही सभेत हा प्रकार घडला.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*