त्यांच्याकडून वसूल करून न्याय देणार : राहुल गांधी

दिल्ली :

पंतप्रधान नरेंद्र मोदी मतदारांची दिशाभूल करताना न्याय योजनेसाठी आयकर व मध्यमवर्गीय यांच्यावर कराचा बोजा वाढविला जाणार असल्याचे सांगतात. मात्र, 72 हजार रुपये देताना न्याय योजनेसाठी आयकर किंवा इतर करांमध्ये वाढ केली जाणार नसून देशाची फसवणूक करणाऱ्या उद्योगपतीकडून हे पैसे वसूल करून देणार असल्याची माहिती काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिली.

फत्तेपुर सिक्री येथील सभेत बोलताना गांधी यांनी भाजपवर जोरदार टीका केली. अच्छे दिनवरून हा पक्ष ‘चौकीदार चोर है’च्या मार्गाने पुढे जात आहे. त्यामुळेच देशातील 20 % गरिबांना जगण्याचा आधार म्हणून प्रतिवर्षी 72 हजार रुपये काँग्रेस देणार आहे. देशात सत्ता आल्यास तातडीने ही योजना लागू केली जाईल. तसेच यासाठीची रक्कम अनिल अंबानी, मेहुल चोक्सी, निरव मोदी, विजय मल्ल्या यांच्यासारख्या देशाला फसविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांच्या खात्यातून वसूल करून दिली जाईल, असे राहुल गांधी म्हणाले.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*