कार्यकर्ते फक्त पवारांच्या सतरंज्या उचलायलाच : फडणवीस

बारामती :

आजोबा शरद पवार यांना पंतप्रधान, दादा अजित पवारांना मुख्यमंत्री, सुप्रियाताईंना केंद्रीय मंत्री, पुतण्या पार्थला खासदार, तर रोहित पवारांना आमदार व्हायचे आहे. एकाच घरातील कितीजण कितीदा निवडणूक लढविणार व पद अडविणार, असा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. तसेच कार्यकर्ते फक्त पवारांच्या सतरंज्या उचलायला असल्याची बोचरी टीका त्यांनी केली.

बारामती लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवार कांचन कुल यांच्यासाठी सुपे येथे आयोजित सभेत फडणवीस बोलत होते. बारामतीकरांनी परिवर्तन केल्यास पाण्याचा प्रश्न मिटवून टाकण्याचे आश्वासन त्यांनी सभेत दिले. तर, चंद्रकांत दादा पाटील यांनी यंदा पवारांच्या घरातील कोणीही निवडुन येणार नसल्याचा दावा केला आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*