मुख्यमंत्री व माजी मुख्यमंत्र्यांवर कारवाई; आयोगाने टाकली प्रचारबंदी

दिल्ली :

उत्तरप्रदेश राज्यातील प्रचारात विखारी भाषा आता नियमितपणे वापरली जात आहे. जात, धर्म व वाईट शब्द वापरून केली जाणारी टीका ही या राज्याची राजकिय ओळख बनली आहे. त्याचाच फटका मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व माजी मुख्यमंत्री बहेनजी मायावती यांना बसला आहे.

आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी योगी यांच्यावर 72 तास, तर मायावती यांच्यावर 48 तास प्रचारबंदीचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. आयोगाकडे आलेल्या तक्रारीनंतर व्हिडीओ फुटेज पाहून व योग्य ती चौकशी करून आयोगाने हा कारवाईचा बडगा उगारला आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*