ते बारामतीकरांना पाजणार पाणी : गावडे

अहमदनगर :

कांचन कूल यांच्या प्रचार मेळाव्यात भाजपा प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब गावडे यांनी इंदापूरकर बारामतीकरांना पाणी पाजल्याशिवाय राहणार नाहीत असा निर्धार केला आहे.

यावेळी ते म्हणाले बारामतीकरांनी फक्त आपल्या तालुक्याचा किंवा ईतर काही भागाचा विकास केला. ईतर तालुक्यांकडे दुर्लक्ष करत अन्याय केला आहे अशी टीका यावेळी केली. तसेच पाठीत खंजीर खुपसल्याचा पुनरोच्चार करण्यात आला. व हर्षवर्धन पाटील यांचे कार्यकर्ते संभ्रमात आहेत असेही सभेत सांगण्यात आले.

यावेळी प्रचारफेरी काढण्यात आली. त्यात युतीच्या उमेदवार कांचन कुल यांनी इंदापूरकरांना न्याय मिळवून देऊ असे आश्वासन दिले. यावेळी भाजपा, रासप आणि ईतर स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*