या लोकसभा मतदारसंघात भाजपांतर्गत बंडाळी..!

नागपूर :

भाजप म्हणजे आदेशानुसार चालणारा पक्ष असेच म्हटले जाते. मात्र, त्यालाच काही ठिकाणी यंदा तडा गेला आहे. त्यातील एक म्हणजे नंदुरबार लोकसभा मतदारसंघ…

नंदूरबार मतदारसंघ प्रथमच भाजपाने 2014 साली जिंकला होता. यापूर्वी तो काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. नंदूरबार लोकसभा मतदारसंघात भाजपाचे निष्ठावंत डाॅ.सुहास नटावदकर यांनी लोकसभेसाठी अपक्ष अर्ज भरला आहे. त्यामुळे त्याचा परिणाम मते फुटणार आहेत. यामुळे साहजिकच हिना गावित यांना हि निवडणुक जड जाणार आहे. यावेळी भाजपाचे मॅनेजमेंट गुरू ‘गिरीश महाजन’ तेथे नटावदकर यांचे बंड शमविण्यासाठी गेले होते. पण महाजन प्रथमच अयशस्वी झाले. फक्त निष्ठावान लोकांच्या आग्रहामुळे माघार घेणार नाही असे नटावदकर यांनी सांगितले.
भाजपाविषयी सर्वसामान्यांच्या मनात रोष, खासदार हिना गावित यांचे विशेष काम नाही व पक्षांतर्गत बंडाळी यामुळे दोघांच्या भांडणात तिसर्याचा लाभ होऊ शकतो आणि हा मतदारसंघ पुन्हा काँग्रेसच्या ताब्यात जाऊ शकतो.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*