शेतकरी प्रश्नांवर राष्ट्रवादी आक्रमक

अहमदनगर :

भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या विजयासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभा घेतल्याने राष्ट्रवादीही जोरदार प्रत्युत्तर देण्यासाठी सक्रिय झाली आहे. भाजपला उत्तर देण्यासाठी राष्ट्रवादी उमेदवार आमदार संग्राम जगताप यांनी शेतकरी प्रश्नावर लक्ष्य केले आहे.

शेतकरी आत्महत्या व ग्रामीण विकासात मोदी सरकारने केलेल्या दुर्लक्षित मुद्द्यांवर जगताप यांनी विशेष व्हिडीओ बनवून व्हायरल केले आहेत. तसेच गावोगावी जाऊन शेतकरी, कष्टकरी व महिला यांना मतदान करण्याचे आवाहन उमेदवार व टीम राष्ट्रवादी करीत आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*