सावधान मतदानकेंद्रात ‘बिग बॉस’च्या कॅमेऱ्याचे लक्ष आहे : भाजप आमदार

जॉर्ज ऑरवेल यांनी १९८४ या जगप्रसिद्ध कादंबरीत बिग बॉस लक्ष ठेऊन असल्याचे चित्र रंगविले आहे. सध्या जगभरात वैयक्तिक स्वातंत्र्याची गळचेपीही जोमात आहे. त्याचवेळी भाजपचे गुजरात राज्यामधील आमदार रमेश कटारा यांनीही त्याच पद्धतीची धमकी देऊन धमाल उडवून दिली आहे. मतदारांना धमकीवजा असे ‘अभ्यासपूर्ण’ भाषण देताना मतदान केंद्रांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॅमेरे बसविल्याचे म्हटले आहे.

कटारा म्हणाले आहेत कि, दाहोद येथील भाजप उमेदवार जसवंत भाभोर यांचा ईव्हीएम मशीनमध्ये फोटो असणार आहे. त्याच्यासमोरच कमळ या चिन्हाचे बटन दिसेल. ते बघताच दाबावे. कोणतीही चुक कोणीही करू नये. कारण यावेळी पंतप्रधान मोदी यांनी मतदान केंद्रावर कॅमेरे बसविले आहेत. आपण काँग्रेसच्या उमेदवाराला मत दिले तर तात्काळ कॅमेऱ्यात ते दिसेल. आधार कार्ड, रेशन कार्डवर सर्वांचे फोटो लावलेले आहेत. त्यावरून संबंधित ओळख होईल. केंद्रामध्ये कमी मते मिळाली तर त्यावरून तपासणी केली जाईल. कोणी मत दिले नाही याची ओळख होऊन तुम्हाला काम मिळणे बंद होईल.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*