मध्य महाराष्ट्रात वादळी पावसाची शक्यता

पुणे :

सलग पाच दिवसांपासून महाराष्ट्र राज्याला झोडपणाऱ्या अवकाळी पावसाने आणखी काही दिवस मुक्काम करण्याचे ठरविले आहे. फळबाग व भाजीपाला पिकांची नासाडी करणारा हा पाऊस मध्य महाराष्ट्राला झोडपून काढण्याची शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे.

किसान या मेसेज सिस्टीमवरून मेसेज प्रसारित करून कृषी विभागाने हवामान विभागाची माहिती सर्व शेतकऱ्यांना पाठवून दिली आहे. त्यात म्हटले आहे की, मध्य महाराष्ट्रामध्ये दि. १७ एप्रिल रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जना, गारपीट व सोसाट्याच्या वा-यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

हा मेसेज प्रसारित झाल्याने शेतकरी मित्रांची चिंता आणखीन वाढली आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*