‘मग मोदी असतील माजी पंतप्रधान’

अहमदाबाद :

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर 23 मेपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे माजी पंतप्रधान असतील. देशात यंदा परिवर्तन होणार असून महाआघाडीला बहुमताने सत्ता मिळाल्यावर मोदी नाही तर, दुसरेच कोणीही पंतप्रधान असतील, असे भाकीत काँग्रेसचे राज्यसभा खासदार अहमद पटेल यांनी केले आहे.

मोदी व भाजप यांच्यावर टीका करताना ते म्हणाले की, सत्ताधारी भाजपने भारतीय जनतेला मागील पाच वर्षे छळले आहे. त्यामुळेच जनता यंदा भाजपला नाही तर, विरोधकांना संधी देईल. गुजरात राज्यातही किमान 50 टक्के जागांवर काँग्रेसचे उमेदवार निवडून येतील.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*