स्मृती इराणींची ती चूक म्हणजे गुन्हा नाही : भाजप

पुणे :

निवडणूक अर्ज भरताना काही चुका अनावधानाने होतात. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्याकडूनही शैक्षणिक पात्रता लिहिताना चूक झाली. त्यांनी यंदाच्या निवडणूक अर्जात ती सुधारली आहे. त्यांची ती चूक गुन्हा नाही, असा दावा भाजप प्रवक्ते माधव भंडारी यांनी केला आहे.

पत्रकार परिषदेत त्यांनी इराणी यांच्या चुकांवर पांघरूण टाकताना हा मुद्दा निकाली काढला. ते म्हणाले की, यापूर्वी काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या अफेडीव्हीटमध्ये एकदा चूक झाली होती. त्यावेळी काँग्रेसने प्रिंटिंगमधील ही चूक मान्य केली होती. हीसुद्धा तशीच साधी चूक आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*