‘ए लाव रे तो व्हिडीओ’ची जोरात चर्चा

मुंबई :

राज ठाकरे आपल्या सभांमधे पुराव्यासहित मुद्दा धरून बोलतात. पुरावा म्हणून ते व्हिडीओ आणि कागदपत्रे सोबत बाळगतात. पण कागदांपेक्षा व्हिडीओमुळे अधिक प्रभाव होतो आणि ते सध्या व्हिडीओच्या माध्यमातून थेट स्टींग ऑपरेशन करत भाजपचे सगळी आश्वासने फेल गेली असे पुराव्यानिशी दाखवत आहेत. त्यामुळे भाजपची भंबेरी उडली आहे.

पण समाजमाध्यमांवर पुन्हा “ए लाव रे तो व्हिडीओ” असे म्हणत अवघ्या महाराष्ट्राचे वातावरण ‘राजमय’ झाले आहे. व्हिडीओ लावताच विरोधकांना धडकी भरते, त्यांचा पर्दाफाश होतो अशा आशयाच्या पोस्ट व्हायरल होताना दिसत आहेत. याच मोहीमेच्या विरोधात भाजपनेही #खोटारडेराज ही मोहीम समाजमाध्यमांवर सक्रिय करत राज यांचे आरोप कसे खोटे आहेत याचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*