काँग्रेसचा जाहिरनामा चौकीदाराच्या हस्ते प्रकाशित

पुणे :

कधी खवचट, कधी थेट सडेतोड, तर कधी शालजोडीतून सत्कार करणार्या पुणेरी पाट्या तुम्ही पाहिल्या असतील. आता पुण्यातील काँग्रेस आघाडीचे उमेदवार आमदार मोहन जोशी यांनी शक्कल लढवली आहे. त्यांनी चक्क एका चौकीदाराच्या हस्ते काँग्रेसचा जाहिरनामा प्रसिद्ध केला आहे.

हा जाहिरनामा पुणेकरांना आश्वासने देण्यात आलेली आहे. पुण्यात मोहन जोशी विरूद्ध गिरीश बापट असा लोकसभेचा सामना रंगणार आहे. यावेळी जाहिरनामा प्रसिद्ध करताना सामान्य नागरिकही उपस्थित होते. चौकीदार आणि सामान्य माणसांच्या हस्ते प्रसिद्ध केलेल्या जाहिनाम्यामुळे आता मोहन जोशींची आयडिया चांगलीच व्हायरल होत आहे. प्रसारमाध्यमांसोबतच समाजमाध्यमेही या गोष्टीची दखल घेत जोशींचे कौतुक करत आहेत.
यापूर्वी गिरीश बापट यांना पाण्याच्या विषयावर प्रश्न उपस्थित करणारे पोस्टर्स पुण्यात लागले होते.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*