मोदी सत्तेवर आल्यास आपली हत्या होईल; या नेत्यांचे हे धक्कादायक विधान

दिल्ली :

मोदी जर पुन्हा सत्तेत आले तर माझी हत्या घडवून आणली जाईल असे धक्कादायक वक्तव्य लोकतांत्रिक जनता दलाचे नेते शरद यादव यांनी केले आहे. यामुळे राज्यातील आणि देशातील राजकीय वातावरणात एकच खळबळ उडाली आहे.

एका मोठ्या नेत्याने पंतप्रधान पदावर असणार्या व्यक्तीसंदर्भात असे वक्तव्य केल्याने याचा परिणाम देशाबाहेरही होऊ शकतो. लोकसभा निवडणुकांदरम्यान अनेक नेते एकमेकांवर बेछूट आरोप करत आहेत. पण शरद यादवांच्या वक्तव्याने आरोपांची परिसीमा गाठली आहे. त्यांच्या या वक्तव्याने बिहार राज्यात तणावाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. शरद यादव हे बेछूट आरोप करतात आणि त्यातुन त्यांना राजकीय चर्चांना ऊधान आणायचे असते अशी चर्चा आहे. यापूर्वीही त्यांनी राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्याबाबतही गंभीर वक्तव्य केले होते.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*