गुन्ह्याच्या जाहिरातीची उमेदवारांना धास्ती; शोधली ‘ही’ पळवाट

अहमदनगर :

यंदा प्रथमच लोकसभा निवडणुकीत उमेदवारी करताना आपल्यावरील गुन्ह्यांची जंत्री स्वखर्चाने जाहिरातीतून जगजाहीर करण्याचा नियम आला आहे. राज्यातील बहुसंख्य उमेदवारांनी या नियमाचा धसका घेतला आहे.

आपल्या जीवनात केलेल्या गुन्ह्यांची माहिती जगजाहीर करण्यामुळे महाराष्ट्रातील बहुसंख्य उमेदवारांची गोची झाली आहे. मात्र, नियमांचे पालनही महत्त्वाचे असल्याने तुलनेत कमी खप असलेल्या वृत्तपत्रांतुन गुन्हेगारी माहितीच्या जाहिराती प्रसिद्ध केल्या जात आहेत.

मतदारांना अंधारात ठरवून फसवणूक करण्याचा खेळ म्हणजे भारतातील राजकीय व्यवस्था. गुन्हेगारी जगताचे अखेरचे विसाव्याचे स्थान म्हणून जगभर राजकिय क्षेत्र ओळखले जाते. आपल्याकडे हेच चित्र आहे. मतदारही वाल्याचा वाल्मिकी झाल्याचे मनोमन ठरवून गुन्हेगारी जगातला राजकारणात लाल गालिचा अंथरूण स्वागत करीत आहेत. हेच काहीअंशी कमी होण्यासाठी जाहिरातीच्या माध्यमातून आपली ‘माजसेवा’ जगजाहीर करून मग समाजसेवक होण्यासाठी हा नवा नियम निवडणूक आयोगाने लागू केला आहे. मात्र, त्याच्याही पळवाटा शोधून उमेदवार आपण साव आणण्याचा आव आणण्यासाठी सरसावले असल्याचे चित्र देशात आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*