मोदींच्या हेलिकॉप्टरमधील ‘त्या’ बॉक्सबद्दल काँग्रेसची तक्रार

बेंगलोर :

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चित्रदुर्ग दौऱ्यात हेलिकॉप्टरमधून एका काळ्या बॉक्सची वाहतूक करण्यात आलेली आहे. त्या बॉक्समध्ये नेमके काय होते असा प्रश्न करीत कर्नाटक काँग्रेस कमिटीने याबद्दल निवडणूक आयोगाकडे चौकशीची तक्रार केली आहे.

मोदींच्या हेलिकॉप्टरमधून काळा बॉक्स काढून घाईत इनोव्हा गाडीत टाकल्याचा व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट करीत प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांनी याबाबत संशय व्यक्त केला आहे. बॉक्स व इनोव्हा गाडीच्या चौकशीसाठी काँग्रेस आग्रही आहे. त्यावर निवडणूक आयोग काय कार्यवाही करणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.

https://twitter.com/KPCCPresident/status/1116966767425777664?s=19

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*