म्हणून तो IAS अधिकारी निलंबित..!

भुवनेश्वर :

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हेलिकाॅप्टरची तपसाणी करण्याचा प्रयत्न मोहम्मद मोहसिन यांनी केला होता. परंतू त्यांना अडवले गेले. आणि त्यानंतर निवडणुक आयोगाने त्यांना निलंबीत केले आहे. सध्या ते Election General Observer म्हणून काम पहात होते.

पंतप्रधानांच्या ताफ्याची तपासणी त्यांना करायची होती पण त्यावेळी त्यांना कर्तव्य बजावण्यापासून रोखण्यात आले. या तपासणीची गंभीर दखल पंतप्रधान कार्यालयाने घेतली. आणि त्यानंतर थेट निलंबीत झाल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले. ओडीसाच्या दोर्यावर असताना तेथे संबलपूर येथे पंतप्रधान मोदी प्रचारासाठी गेले होते. त्यावेळी ही तपासणी करण्याचा प्रयत्न मोहम्मद यांनी केला. यानंतर पंतप्रधान कार्यालयाने निवडणुक आयोगाकडे तक्रार केली आणि निवडणुक आयोगाच्या एका पथकाने प्रकरण जाणून घेत मोहम्मद यांनी निवडणुक आयोगाच्या नियमांचे उल्लंघन केले असा शेरा देत त्यांचे निलंबन केले.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*