राज ठाकरेंच्या घरावर छापे घालून दाखवा,; भाजपला आव्हान

मुंबई :

सध्या महाराष्ट्रात राज ठाकरेंनी जे भाजपविरोधी वातावरण तयार केले आहे त्याचा भाजपने धसका घेतला आहे. ‘ए लाव रे तो व्हिडीओ’ या कँपेनसमोर सगळेच कँपेन फिके पडत आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला एक आव्हान दिले आहे.

धाडस असेल तर राज ठाकरेंच्या घरावर छापे घालून दाखवा असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिले आहे. सध्या भाजप फक्त प्राधान्याने राज ठाकरे आणि पवार कुटूंबाला टार्गेट करत आहेत. यावेळी नवाब मलिक यांनी म्हटले की राज 2014 ला जेव्हा भाजपचा प्रचार करत होते पण ते भाजपाविरोधी भुमिका सभेत घेत आहेत तेव्हा मात्र त्यांच्या सभांवर आक्षेप घेतला जात आहे.
आता या आव्हानाचे प्रत्युत्तर भाजपा कसे देणार हे पाहणे महत्वाचे ठरेल.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*