Blog | कर्तव्याची जाणीव करून देणारा अवलिया पाहिलाय का..?

तुमच्या गावात शहरात किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी एखादा माणूस मतदान करा अशी माहिती सांगत असेल. त्याच्या शर्टवर गाडीवर टोपीवर आणि गाडीला लावलेल्या झेंड्यावरही मतदान करा, अमिषाला बळी पडू नका असे संदेश लिहीलेले असतील तर बुचकाळून जाऊ नका. तर हा कुठल्या उमेदवाराचा प्रचार नाही किंवा कुठल्या पक्षाचाही नाही. यापलीकडे जाऊन हा सरकारने मतदान जनजागृतीसाठी पाठवलेला माणूस आहे असंही तुम्हाला वाटू शकतं पण तसंही नाहीये. म्हणतात ना स्वयंप्रेरणेने होत असलेल्या गोष्टी अजब असतात त्यातलाच हा प्रकार.

वयाच्या बावण्णाव्या वर्षी हा अवलीया 100 टक्के मतदान व्हावे म्हणून अहोरात्र प्रचार करतोय.
पुणे, मुंबई, ठाणे, पालघर, भिवंडी, बीड, कर्जत, नगर एवढ्या ठिकाणी मतदान जनजागृतीचा करूनही ते अजुन पुढील प्रवासाला निघणार आहेत. स्वखर्चातून त्यांनी हा प्रवास सुरू केला आहे. आजचा विचार न करता पुढील 50 वर्षांचा विचार करून मतदान करावे. देशाच्या प्रगतीसाठी 100% मतदान व्हायला पाहिजे असेही मत त्यांनी व्यक्त केले.

यापूर्वीही ते जंतर मंतर मैदानावर उपोषणाला बसले होते. प्रत्येकाला निवडणुकीत मतदान करावे हि सक्ती करावी यासह त्यांच्या अजुन 20 मागण्या होत्या.
लोकशाही धोक्यात येत आहे असे काही लोक बोलत आहेत. जे बोलत आहेत ते त्यांच्यापरीने विशिष्ट पातळीवर या मोहीमेवर लढत आहेत तर बापूरावांसारखा सामान्य व्यक्ती मतदानाच्या माध्यमातून लोकशाहीला बळकट करा आणि 100 टक्के मतदान करा असेही सांगत आहे. आता तुम्हीही मनावर घ्या आणि कुठल्याही अमिषाला बळी न पडता मतदान करा.

लेखक : विनोद सुर्यवंशी (सामजिक-राजकीय अभ्यासक), अहमदनगर

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*