डॉ. सुजय यांच्यासाठी धनश्री विखेही मैदानात

अहमदनगर :
भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांना प्रचारात मदतीसाठी आता त्यांच्या पत्नी धनश्री याही मैदानात उतरल्या आहेत.

राष्ट्रवादीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्याकडून पत्नीसह सर्व कुटुंबीय प्रचारात कार्यरत आहेत. अशावेळी विखे यांनीही आता सर्व कुटुंबियांसह प्रचाराला सुरुवात केली आहे.

नगरमध्ये सावेडी भागातील कजबेवस्ती परिसरातील पुण्यश्‍लोकनगर धनश्री विखे यांनी माजी नगरसेवक दिगंबर ढवण, निशांत दातीर, डॉ. राहुल कडूस, प्रा. चंद्रकांत वाव्हाळ, नितीन बोठे, इंजि. डि. आर. शेंडगे, अमोल काळे, रेणुकादास ठोंबरे, प्रा.कुटे यांच्यासह प्रचार केला.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*