डॉ. सुजय विखे यांच्यासह माजी आमदार राठोड हेही भिंगारकरांच्या भेटीला

अहमदनगर :

भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांना नगर शहर व तालुक्यातून विजयी आघाडी दे यासाठीचे प्रयत्न शहर व तालुक्यातील शिवसेना करीत आहे. त्याचाच भाग म्हणून आता शिवसेना-भाजपने माजी आमदार अनिल राठोड यांच्यासह भिंगारमध्ये विशेष लक्ष केंद्रित केले आहे.

भिंगार येथील प्रचार फेरीत डॉ. सुजय विखे व अनिल राठोड यांनी नागरीकांशी संवाद साधला आहे. त्यावेळी महापौर बाबासाहेब वाकळे, शिवसेना शहरप्रमुख दिलीप सातपुते, माजी महापौर भगवान फुलसौंदर, नगरसेवक योगीराज गाडे, शाम नळकांडे, शरद झोडगे, सुनिल लालबोंद्रे, दत्ता कावरे आदी उपस्थित होते.

जनतेने संधी दिल्यास पुढील पाच वर्षात नगर शहरासह भिंगार शहराचाही कायापालट करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सुजय विखे यांनी यावेळी सांगितले.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*