मोदींनंतर शहांनीही घेतला ‘काळ्या’चा धसका..!

बारामती:

अहमदनगर येथे झालेल्या मोदींच्या प्रचारसभेत काळे शर्ट, काळे रूमाल याच्यापलीकडे जाऊन महिलांच्या काळ्या ओढण्या काढून घेतल्या गेल्या. सभेत काळ्या रंगाची पाण्याच्या बाटल्यांची पिशवी सुद्धा काढून घेतली जात होती. असाच काळ्या रंगाचा धसका भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी घेतला आहे.

बारामती येथील झालेल्या सभेत सुरक्षेचा अतिरेक झाल्याची तक्रार सामान्य नागरिकांनी बोलून दाखवली. या सुरक्षेच्या कचाट्यातून पत्रकार सुद्धा सुटले नाहीत. त्यांचेसुद्धा रूमाल चेक करण्यात आले. कुठलीही काळ्या रंगाची वस्तू कपडे असणार्यांना सभेत जाण्यास परवानगी नव्हती. यामुळे निष्ठावंत भाजप कार्यकर्त्यांना रस्त्यावर ऊभा राहून सभा ऐकावी लागली. यामुळे कार्यकर्ते सुद्धा काही प्रमाणात नाराज झालेले दिसून आले.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*