उदयनराजेंची काॅलर तर नरेंद्र पाटलांच्या मिशा

सातारा :

लोकसभा मतदारसंघात सोशल मिडीयावर कार्यकर्ते धुमाकूळ घालत आहेत. एका बाजूला अवघ्या महाराष्ट्राला ज्ञात असलेले काॅलर उडवणारे उदयनराजे यांचे कार्यकर्ते ‘स्टाईल इज स्टाईल’ म्हणत पोस्टरबाजी करत आहेत तर विरोधात असलेले शिवसेनेचे नरेंद्र पाटील ह्यांच्या पिळदार मिशा सोबत ‘आमचं ठरलंय’ अशा आशयाचे पोस्टर्स सोशल मिडीया वर व्हायरल होत आहेत.

उदयनराजेंला कोण टक्कर देणार अस म्हणता म्हणता नरेंद्र पाटील यांनी ही निवडणुक बरोबरीची केली आहे. प्रचारासाठीचा हा नवखा पॅटर्न नागरीकांना चांगला वाटतो आहे. शेवटी उदयनराजेंचा पॅटर्नपेक्षा हा साताराचा सोशल मिडीया पॅटर्न जास्त गाजतो आहे. आता काॅलर टाईट होणार की मिशाला ताव मारला जाणार हे आता निकालंच ठरवेल.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*