गुगल सर्चवर राज ठाकरेंनी टाकले पवार फडणवीसांना मागे

मुंबई :

राज ठाकरे यांच्या सभांमुळे भाजपला पळता भुई थोडी असा प्रकार झालेला आहे. ‘ए लाव रे यो व्हिडीओ’ या सोशल मिडीयावरील कँपेनमुळे भाजपचे सगळे कँपेन फिके पडत आहेत. त्यातच आता भर पडली आहे. राज ठाकरे हे गुगल सर्च इंजिनवर सर्वात जास्त सर्च केले जात आहेत. यात त्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही भागे टाकले आहे.

गेल्या आठवडाभरात राज ठाकरे हे शब्द सर्वात जास्त सर्च झाल्याचे गुगल दाखवत आहे. नेटीझन्स हे ईतर पुढार्यांपेक्षा राज ठाकरे यांच्या जास्त प्रभावात असल्याचे यातून समोर येत आहेत.
महाराष्ट्रातून राज ठाकरे यांना सर्वात जास्त सर्च केले जात आहे. तसेच कर्नाटक, छत्तीसगड, गोवा आणि झारखंड येथेही राज ठाकरे हे दोन शब्द जास्त प्रमाणात सर्च झाल्याचे प्रमाण आहे. तसेच ‘ए लाव रे तो व्हिडीओ’ हे शब्दही खुप सर्च झाल्याचे वृत्त आहे. यामुळे समाजमाध्यमांसहित गुगलवरही राज’सत्ता’ असल्याचे चित्र दिसत आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*