अमोल कोल्हेंचे शंभुप्रेम व्यावसायिक : पाटील

पुणे :

लोकसभा निवडणुक तोंडासमोर असताना शिवसेनेचे हातातील शिवबंधन सोडीत हाती घड्याळ घेतले आणि राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी ते शिरूर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव यांच्या विरोधात उतरले आहेत. यानंतर शिवसेनेच्या महिला आघाडीने त्यांच्यावर आता आरोप केला आहे की कोल्हेंचे शंभुप्रेम हे व्यावसायिक आहे.

त्यांनी मराठी टायगर्स या चित्रपटाच्या एका प्रेमगीताचे पन्हाळा गडावर शुटींग केले. आणि यावेळी कुठलीही परवानगी काढली नव्हती त्यामुळे हे शंभुप्रेम व्यावसायिक असल्याचा आरोप शिवसेना महिला आघाडीने केला आहे. अमोल कोल्हेंचा ईतिहास आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र गडावर कोल्हेंनी अश्लील चाळे केले असे धक्कादायक माहिती पत्रकार परिषदेत दिली.
स्वतःला शिवभक्त म्हणवणारे आणि वागण्या- बोलण्यात महाराजांची प्रतिमा दाखवणारे अमोल कोल्हे या थराला कसे जाऊ शकतात असाही प्रश्न यावेळी त्यांनी उपस्थित केला.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*