मोदींनंतर आता गडकरीही जातीवर बोलले..!

औरंगाबाद :

ज्यांना विकासावर मतदान मागता येत नाही त्यांनीच या निवडणुकीत आता जातीच्या मुद्यांवर मत मागायला सुरुवात केली आहे, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या मागासवर्गीय जातीमुळे विरोधी पक्ष लक्ष्य करीत असल्याचे सांगितले होते. आता गडकरी यांनी विरोधकांवर टीका करताना याचाच अगदी परस्परविरोधी वक्तव्य करून भाजपच्या गोटात खळबळ उडवून दिली आहे.

पैठण येथील सभेत बोलताना गडकरींनी काँग्रेस-राष्ट्रवादी जातीचा आधार घेत असल्याचे म्हटले आहे. तर मोदींनी जात पुढे करीत विरोधक टार्गेट करीत असल्याचे म्हटले आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*