डॉ. सुजय विखेंचा विजय निश्चित : मुंडे

अहमदनगर :

भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांना शेवगाव-पाथर्डीत मोठी आघाडी देण्यासाठीचे प्रयत्न ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे करीत आहेत. त्याचाच भाग म्हणून त्यांनी या भागात आज पुन्हा एकदा प्रचारसभा घेत मतदारांना भावनिक साद घातली.

डॉ. विखे यांच्यासह आमदार मोनिकताई राजळे या सभेत उपस्थित होते. मुंडे म्हणाल्या की, नगरसह देशभरात भाजपची लाट कायम आहे. पुन्हा एकदा देशात भाजपला सत्तेवर बसून विकासकामे करण्याची संधी मतदार नक्की देतील. डॉ. विखे यांचाही विजय त्यामुळेच निश्चित आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*