पवारांची राष्ट्रवादी विजयासाठी आक्रमक

अहमदनगर :

भाजपच्या ताब्यात असलेली नगरची जागा जिंकून राज्यात दोन आकडी खासदार निवडून आणण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. त्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी नगरकडे विशेष लक्ष केंद्रित केले आहे.

भाजपने डॉ. सुजय विखे पाटील यांना उमेदवारी देत या जागेवरील विजयाचा दावा आणखी पक्का करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, त्यांना शह देण्यासाठी पवार साहेबांच्या राष्ट्रवादीने युवक आमदार संग्राम जगताप यांना रिंगणात उतरवून आव्हान दिले आहे.

विखे व जगताप दोन्ही गट विजयाचा दावा करीत प्रचार करीत आहेत. पवार साहेबांनी सहा-सात सभा व बैठका घेऊन दावेदारी आणखी पक्की केली आहे. पवार सध्या फक्त बारामती व नगरमध्ये अडकून पडल्याने भाजपच्या गोटात आनंद व्यक्त होत आहे. मात्र, विजयासह खासदार होण्याची संधी कोणाला मिळणार हे सांगण्यासाठी अजूनही कोणी पुढे येत नसल्यासारखे चित्र आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*