नगरमध्ये ‘मुन्नाभाई’ विरुद्ध ‘भाई’..!

अहमदनगर :

भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मुन्नाभाई म्हणून सोशल मीडियावर टारगेट केले जात आहे. त्याला उत्तर देताना डॉ. विखे यांनी विरुद्ध उमेदवार आमदार संग्राम जगताप यांना भाई म्हणून लक्ष्य केले आहे.

शेवगाव येथील सभेत डॉ. विखे यांनी भाई असा उल्लेख करतानाच राष्ट्रवादी पक्ष व उमेदवार जगताप यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांना लक्ष्य करीत टीका केली. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत झालेल्या सभेत डॉ. विखे बोलत होते. ते म्हणाले की, विकासाचे मुद्दे नसल्याने फक्त वैयक्तिक टीकाटिप्पणी करून विरोधी उमेदवार जनतेची दिशाभूल करीत आहेत.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*