नगरमध्ये निवडणुकीत पाणीप्रश्न ऐरणीवर

अहमदनगर :

दक्षिण नगर जिल्ह्यातील शेती व पाण्याचा मुद्दा ऐरणीवर आणून निवडणूक जिंकण्याची तयारी भाजपने केली आहे. त्यालाच प्रत्युत्तर देताना राष्ट्रवादीने शेतकरी आत्महत्या हा विषय पटलावर घेतला आहे.

नगरमधील सकाळाई योजना, तुकाई चारी, कुकडी चारी, वांबोरी चारी हे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिलेले आहे. तर, अर्ज भरण्यापासून शेतकरी प्रश्नांची सोडवणूक करण्याची भूमिका राष्ट्रवादीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांनी घेतली आहे. त्यालाच जोरदार उत्तर देताना नगरचे हक्काचे पाणी बारामतीकरांनी पालविल्याचा मुद्दा मांडून डॉ. विखे यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह विरोधकांना लक्ष्य केले आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*